असेच कधीतरी
तू आणि मी अचानक भेटावे
आश्चर्य लपवत
आनंदाने फुलून यावे
तू आणि मी अचानक भेटावे
आश्चर्य लपवत
आनंदाने फुलून यावे
असेच कधीतरी
तू आणि मी शांत बसावे
काहीच न बोलता
सहवास अनुभवत असावे
तू आणि मी शांत बसावे
काहीच न बोलता
सहवास अनुभवत असावे
असेच कधीतरी
तू आणि मी दूर जावे
उद्याची स्वप्न रंगवत
काही काळ आजला विसरावे
तू आणि मी दूर जावे
उद्याची स्वप्न रंगवत
काही काळ आजला विसरावे
असेच कधीतरी
आपण भेटत राहावे
प्रत्येक्षात नाही
तर आठवणीत सदैव असावे.
आपण भेटत राहावे
प्रत्येक्षात नाही
तर आठवणीत सदैव असावे.
2 comments:
mrunal, publish a book of all ur marathi kavita.....i will definitely buy it!!!! awesome.....
Wah awesome. So deep feelings. Loved it. 🤗😍😘😘
Post a Comment