Thursday, March 22, 2018

Tula mi aani mala tu

तुला मी आणि मला तू
कसे काय भेटलो
एकमेकांच्या सोबतीने
वेगवेगळी आयुष्य जगत चाललो

सगळे सांगतो एकमेकांना
एकमेकांना खांदा देतो
हातात हात कधीही न घेता
अखंड साथ मात्र करत असतो

तुझ्याशी चार शब्द बोलून
दिवस छान जातो
एकटेपणा थोडा वेळ का होईना
थोडातरी निशब्द होतो

तू तिथे मी इथे 
भेट कधीही होत नाही
एकमेकांच्या आठवणीत असल्याशिवाय
दुसरी जागा काही उरली नाही

कुठेतरी कधीतरी
नाहीतर त्या क्षितिजावर भेटूया
हलकेच समुद्र काठी
लाटा ऐकत एका रम्य संध्याकाळी
कधीतरी दोन क्षण घालवूया

Monday, July 11, 2011

Saad

कधी कधी वाटतं
झुगारून द्यावी ही सगळी बंधनं
झुगारून द्यावा हा मनाला घातलेला बांध
भावनांना वाट करून द्यावी
आणि निशब्द प्रेमाच्या वर्षावात
दोन मने नुसती न्हाऊ घालावी

फक्त तो आणि मी
दुसरं तिसरं कोणी नाही
मनात नवीन पालवी
आणि फक्त एकमेकांसाठी ही नवी उभारी

सभोतालचा जग विसरून
दूर कुठेतरी जाऊन
एकमेकांच्या सहवासात
नुसते फुलत राहून

जमेल का रे सख्या
असं फक्त एकमेकांसाठीच जगून?

Friday, July 1, 2011

Happy Wedding anniversary

5 years of togetherness
5 years of joy
some moments of fight
and the rest full of life

5 years of support
and 5 years of love
together we have
come indeed far across

I wish you lots of success
and a life full of fun
I will always be by your side
in all thick and thin

Tuesday, June 14, 2011

For you dear Amit

You and I were best of buddies
always hanging around together
Be it any game or celebration
we never left one another

We fought, we laughed
we cried
It was indeed a
wonderful life

But as we grew up,
we drifted apart
we lost track of each other
Destiny surely played it's part

Then almost after 18 years,
we met again at the ariport
this time as two individuals
with heart brimming with hope

All those wonderful memories
I still cherish in my heart
It is indeed great to have met you again
and have you back in my life

On this special day of yours
I wish you all the joy and happiness
May you achieve all what you aspire and
may you always climb the ladders of success

Sunday, April 10, 2011

Tujhyasathi

तू माझ्या आयुष्यात येणें,
मला बरंच काही देऊन गेले,
शब्दांच्या पलीकडेही
एक जग असतं,
हे तुझ्या डोळ्यांनी 
दाखवून दिले ...

प्रेमात पडणं, ते ओळखणं,
ते फुलवणं, त्यात गुंतत जाणं,
ती नाजूक वीण घट्ट करणं,
एकमेकांना बरोबर ओळखून,
एकमेकांसाठीच जगणं,
हे आपल्याला कसं रे सहज जमून गेलं?

तुला आठवणं,
तुझ्या विचारात हरवणं,
तुझ्या सहवासात घालवलेले क्षण
स्मरणं
एक रतीबच होऊन बसलं

हे जग आधीही होतंच,
ते तू सुंदर केलंस
तू माझं असणं आणि जगणं
अधिकच फुलवलस

Kaahi naati

कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा  पुरतं उरलं आहे

असं मी ऐकलं आहे
सगळं क्षणभंगुर असतं
क्षणात  नातं तोडलं आणि जोडलं जातं
माणसाला मोडला, मारला, वाकवला जातं

पण काही नाती ही अभेद्य असतात
आकालन शक्तीच्या पलीकडली असतात
सुखात, दुखात, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष
साथ देतात आणि
काहीच अपेक्षा न ठेवता
फक्त सोबत चालतात
सदैव आपलं चिंतन करून
प्रेमाचा, आपुलकीचा, आशीर्वादाचा
वर्षाव करत असतात

अशी नाती ही असतात
आपल्याला भेटतात
आपल्याला आजूबाजूलाच
कुठेतरी लपलेली असतात

थोड्या फार फरकाने
तुमच्या आमच्या सारखीच असतात
अशी नाती बघून
कोणी अजून ही  असं म्हणेल का?

कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरता उरलं आहे

Tu


तू  आज  खूप  काही  देऊन  गेलास
मनाच्या  तारा  छेडून  गेलास
एक  नवीनच  सूर  जोडून  गेलास
एक  नवीनच  सुख  देऊन  गेलास

आपण जेव्हा एकत्र होतो
जरी जास्ती काहीच बोलत नव्हतो
तरी खूप काही ऐकत होतो
खूप काही सांगत  होतो

भावनांना शब्दांचे बंधन नसते
सगळेच काही बोलायचे नसते
स्पन्दानाना झेलायचे असते
सहवासात फुलून यायचे असते

तू ही आज तेच केलेस
एक अतीव आनंद्किरण दिलेस
एक वेगळे वळण दिलेस
मला स्वतःत हरवलेस 

Maitri


भेट तुझी माझी 
अवचितच घडलेली 
मैत्रीच्या ऋणानुबंधाच्या
नकळत बांधली गेलेली 
मैत्री तुझी माझी
अशीच घट्ट व्यावी 
यशाचे शिखर चढत 
तुझी हर एक इच्छा पूर्ण व्यावी
मनातली उभारी कायम  रहात 
सवंगड्यांची साथ मिळावी!

Pahila paaus

आज परत फिरून पाउस बरसतोय 
धरणीला न्हाऊ घालतोय 
सगळे कसे उल्हासित करू पाहतोय 
मन मोराचा पिसारा फुलतोय 

थेंब ओघळतात 
हातावर निथळून येतात 
गारवा सभोतली 
मनात ही कसली उभारी?

एक आठवण जपलेली 
मनात साठवलेली 
पाउसाच्या रुपात 
सदृश्य झालेली 

Alipta

हल्ली मला कशाचा
काहीच वाटत नाही 
सगळ्यांशीच काही 
आपला सूर जुळत नाही
 
आपण कसं वागायचं
हे आपणच ठरवायचा असतं का?
काय धरून ठेऊन 
किती आणि काय काय सोडून द्यायचं असतं?
 
आपलीच सख्खी माणसं 
आपल्याशी तुटकपणे वागतात 
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा देऊनही 
काटेच आपल्याला परत करतात 
 
मनाची नाती हीच खरी नाती असतात 
दूर असून देखील चिरंतर 
ओलावा, मनोबल आणि धैर्य 
आपल्याला देत असतात.