भेट तुझी माझी
प्रत्यक्षात
पहिल्यांदाच झाली
ओळख मात्र फार
जुनीच असल्यासारखी वाटली
तुझं असणं तुझं हसणं
तुझं असंच माझ्या डोळ्या मधल्या भावनांचे
विश्लेषण करणं,
शब्दां पलीकडला काहीतरी
सांगू पहाणं
आणि एकटच स्वतःशी
काहीतरी गुणगुण करणं
मैत्रीसाठी मनात
प्रेम, ओढ, आपुलकी असावी लागते
वेळ, काळ, अंतर
ही कधीच मर्यादा नसते
तुला भेटून हेच परत परत स्मरते
ऋणानुबंध
प्रत्यक्षात
पहिल्यांदाच झाली
ओळख मात्र फार
जुनीच असल्यासारखी वाटली
तुझं असणं तुझं हसणं
तुझं असंच माझ्या डोळ्या मधल्या भावनांचे
विश्लेषण करणं,
शब्दां पलीकडला काहीतरी
सांगू पहाणं
आणि एकटच स्वतःशी
काहीतरी गुणगुण करणं
मैत्रीसाठी मनात
प्रेम, ओढ, आपुलकी असावी लागते
वेळ, काळ, अंतर
ही कधीच मर्यादा नसते
तुला भेटून हेच परत परत स्मरते
ऋणानुबंध
बास
ह्याला अजून काय म्हणावे?
ह्याला अजून काय म्हणावे?
No comments:
Post a Comment