Saturday, April 9, 2011

Nisarga

एक वाट चालत होते, रानात
धूसर धूसर
मनी होती कसलीशी 
हुरहूर
धुंद, मंद वातावरण
त्या सोबत सूर्याची सुंदर साथ
हिरवी, पिवळी, लाल, गुलाबी
पानेफुले, एक वेगळाच थाट
पाखरांचा किलबिलाट
झाडांशी  हितगुज
संगती असे वाराही
एक वेगळाच नूर
एक वेगळाच सूर
एक अनुभवता आणि पाहता सारे
होते मी निशब्द
निसर्गाची किमया
असते काही औरच
मी एकटीच चालते
स्वतःलाच शोधते
स्वतःलाच सापडते

No comments: