Monday, July 11, 2011

Saad

कधी कधी वाटतं
झुगारून द्यावी ही सगळी बंधनं
झुगारून द्यावा हा मनाला घातलेला बांध
भावनांना वाट करून द्यावी
आणि निशब्द प्रेमाच्या वर्षावात
दोन मने नुसती न्हाऊ घालावी

फक्त तो आणि मी
दुसरं तिसरं कोणी नाही
मनात नवीन पालवी
आणि फक्त एकमेकांसाठी ही नवी उभारी

सभोतालचा जग विसरून
दूर कुठेतरी जाऊन
एकमेकांच्या सहवासात
नुसते फुलत राहून

जमेल का रे सख्या
असं फक्त एकमेकांसाठीच जगून?

Friday, July 1, 2011

Happy Wedding anniversary

5 years of togetherness
5 years of joy
some moments of fight
and the rest full of life

5 years of support
and 5 years of love
together we have
come indeed far across

I wish you lots of success
and a life full of fun
I will always be by your side
in all thick and thin

Tuesday, June 14, 2011

For you dear Amit

You and I were best of buddies
always hanging around together
Be it any game or celebration
we never left one another

We fought, we laughed
we cried
It was indeed a
wonderful life

But as we grew up,
we drifted apart
we lost track of each other
Destiny surely played it's part

Then almost after 18 years,
we met again at the ariport
this time as two individuals
with heart brimming with hope

All those wonderful memories
I still cherish in my heart
It is indeed great to have met you again
and have you back in my life

On this special day of yours
I wish you all the joy and happiness
May you achieve all what you aspire and
may you always climb the ladders of success

Sunday, April 10, 2011

Tujhyasathi

तू माझ्या आयुष्यात येणें,
मला बरंच काही देऊन गेले,
शब्दांच्या पलीकडेही
एक जग असतं,
हे तुझ्या डोळ्यांनी 
दाखवून दिले ...

प्रेमात पडणं, ते ओळखणं,
ते फुलवणं, त्यात गुंतत जाणं,
ती नाजूक वीण घट्ट करणं,
एकमेकांना बरोबर ओळखून,
एकमेकांसाठीच जगणं,
हे आपल्याला कसं रे सहज जमून गेलं?

तुला आठवणं,
तुझ्या विचारात हरवणं,
तुझ्या सहवासात घालवलेले क्षण
स्मरणं
एक रतीबच होऊन बसलं

हे जग आधीही होतंच,
ते तू सुंदर केलंस
तू माझं असणं आणि जगणं
अधिकच फुलवलस

Kaahi naati

कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा  पुरतं उरलं आहे

असं मी ऐकलं आहे
सगळं क्षणभंगुर असतं
क्षणात  नातं तोडलं आणि जोडलं जातं
माणसाला मोडला, मारला, वाकवला जातं

पण काही नाती ही अभेद्य असतात
आकालन शक्तीच्या पलीकडली असतात
सुखात, दुखात, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष
साथ देतात आणि
काहीच अपेक्षा न ठेवता
फक्त सोबत चालतात
सदैव आपलं चिंतन करून
प्रेमाचा, आपुलकीचा, आशीर्वादाचा
वर्षाव करत असतात

अशी नाती ही असतात
आपल्याला भेटतात
आपल्याला आजूबाजूलाच
कुठेतरी लपलेली असतात

थोड्या फार फरकाने
तुमच्या आमच्या सारखीच असतात
अशी नाती बघून
कोणी अजून ही  असं म्हणेल का?

कोण कोणाच्या वाट्याला
आयुष्यभर पुरलं आहे
इथे तर प्रेम फक्त
नावा पुरता उरलं आहे

Tu


तू  आज  खूप  काही  देऊन  गेलास
मनाच्या  तारा  छेडून  गेलास
एक  नवीनच  सूर  जोडून  गेलास
एक  नवीनच  सुख  देऊन  गेलास

आपण जेव्हा एकत्र होतो
जरी जास्ती काहीच बोलत नव्हतो
तरी खूप काही ऐकत होतो
खूप काही सांगत  होतो

भावनांना शब्दांचे बंधन नसते
सगळेच काही बोलायचे नसते
स्पन्दानाना झेलायचे असते
सहवासात फुलून यायचे असते

तू ही आज तेच केलेस
एक अतीव आनंद्किरण दिलेस
एक वेगळे वळण दिलेस
मला स्वतःत हरवलेस 

Maitri


भेट तुझी माझी 
अवचितच घडलेली 
मैत्रीच्या ऋणानुबंधाच्या
नकळत बांधली गेलेली 
मैत्री तुझी माझी
अशीच घट्ट व्यावी 
यशाचे शिखर चढत 
तुझी हर एक इच्छा पूर्ण व्यावी
मनातली उभारी कायम  रहात 
सवंगड्यांची साथ मिळावी!

Pahila paaus

आज परत फिरून पाउस बरसतोय 
धरणीला न्हाऊ घालतोय 
सगळे कसे उल्हासित करू पाहतोय 
मन मोराचा पिसारा फुलतोय 

थेंब ओघळतात 
हातावर निथळून येतात 
गारवा सभोतली 
मनात ही कसली उभारी?

एक आठवण जपलेली 
मनात साठवलेली 
पाउसाच्या रुपात 
सदृश्य झालेली 

Alipta

हल्ली मला कशाचा
काहीच वाटत नाही 
सगळ्यांशीच काही 
आपला सूर जुळत नाही
 
आपण कसं वागायचं
हे आपणच ठरवायचा असतं का?
काय धरून ठेऊन 
किती आणि काय काय सोडून द्यायचं असतं?
 
आपलीच सख्खी माणसं 
आपल्याशी तुटकपणे वागतात 
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा देऊनही 
काटेच आपल्याला परत करतात 
 
मनाची नाती हीच खरी नाती असतात 
दूर असून देखील चिरंतर 
ओलावा, मनोबल आणि धैर्य 
आपल्याला देत असतात.

Saturday, April 9, 2011

Aayushyacha gaNit

काय हरवले?
काय गवसले?
काय शोधले?
काय सापडले?
स्वतःच्याच नादात
ह्या सार्याचे
गणित मांडायचे
राहून गेले
आयुष्य हे एक गणित असते का?
दोन अधिक दोन चारच असते का?
हे वेडे मन नेहमीच गणित चुकवते
सोप्या गोष्टी अवघड करून ठेवते
लपंडाव खेळत, आनंद लुटत, घेत
ठेच खात पुढे सरसावत असते
खरे प्रेम शोधात राहते
खूप थोड्यांना ते सापडते
बर्याच जणांचे राहूनच  जाते

Tu hotis tevha


तू होतीस तेव्हा



तुझे  असणे,
तुझे  हसणे,
तुझे रुसणे,
फार हवेहवेसे वाटायचे

डोळ्यातून तुझे बोलणे,
अलगद हातात हात देणे,
असाच मला बिलगणे,
मला सुखावून जायचे

तू आता नाहीस,
फार एकटे वाटते
हे जग म्हणजे नुसते
वाळवंत भासते

सखे,

येशील का ग हा वाळवंत फुलवायला?
ह्या रुक्ष जीवनात हास्य पेरायला?
प्रेमाचा वर्षाव करायला?
पुन्हा एकदा?

एकदाच???



Bhet tujhi majhi

भेट तुझी माझी
प्रत्यक्षात 
पहिल्यांदाच झाली
ओळख मात्र फार
जुनीच असल्यासारखी वाटली

तुझं असणं तुझं हसणं 
तुझं असंच माझ्या डोळ्या मधल्या भावनांचे 
विश्लेषण करणं,
शब्दां पलीकडला काहीतरी
सांगू पहाणं
आणि एकटच स्वतःशी
काहीतरी गुणगुण करणं 

मैत्रीसाठी मनात
प्रेम, ओढ, आपुलकी असावी लागते
वेळ, काळ, अंतर
ही कधीच मर्यादा नसते

तुला भेटून हेच परत परत स्मरते
ऋणानुबंध  
बास 
ह्याला अजून काय म्हणावे?

Sunshine

You came into my life
As a breath of fresh air
And a unleashed a spirit
Of which even I was unaware

You are my sunshine
On a dampened and dull day
How can I ever thank you
For having brought myself back to me?

Destiny brought us together,
In nick of time
To be with each other
In lows and highs

Understanding, trusting and knowing a person so much
Has never been a pure joy
As it is now
Since you have become mine.

Friend

The one who cares,
The one who shares,
The one who comes running
Even when you haven’t called

The one who wipes your tears
The one who makes you things clear
The one who is always there by your side
No matter how and what you are

The one who understands you
Guides you and counsels you
Corrects you and fights for you
When you are down

The one who knows you more than yourself
The one whom you can trust more than anyone else
The one who is your punching bag
And also a shoulder to relax

Is truly a gift from god
To be cherished and kept in your heart
Who walks by your side
No matter what

asech kadhitari

असेच कधीतरी
तू आणि मी अचानक भेटावे
आश्चर्य लपवत
आनंदाने फुलून यावे

असेच कधीतरी
तू आणि मी शांत बसावे
काहीच न बोलता
सहवास अनुभवत असावे

असेच कधीतरी
तू आणि मी दूर जावे
उद्याची स्वप्न रंगवत
काही काळ आजला विसरावे

असेच कधीतरी
आपण भेटत राहावे
प्रत्येक्षात नाही
तर आठवणीत सदैव असावे.

Doesn't matter

Doesn’t matter
Even if v r friends no longer
The days when v were together
Shall be cherished forever
Even if u don’t talk to me like before
Doesn’t matter
You at least have others with whom
You can share ur burdens
Even if u don’t think of me anymore
Doesn’t matter
The days u thought and cared for me
Were so bright
Even if the life is different
U not being around
Doesn’t matter
But am glad that u once were
I will always wish for u
That u get the best
Always be happy
And climb the ladders of success!!!!

Tu nastes tevha

तू नसतेस तेव्हा
सगळे कसे भकास वाटते
हे जग म्हणजे नुसते वाळ्वंत भासते

तू नसतेस तेव्हा
मन तुझ्याकडेच धाव घेते
नाहीतर तुलाच साद घालत बसते

तू नसतेस तेव्हा
माझा मी कुठे उरतो?
तुझ्याच आठवणीन मध्ये हरवतो

हे असेच किती दिवस चालणार?
तू प्रत्येक्षात कधी मूर्त होणार?

Paaus

पाउस असा कोसळतोय,
काहीतरी सांगू पाहतोय,
मनात दाटलेले सगळे काही
जणू
आज त्याच्याच रूपाने बरसू पाहताय!!!!

खूप दिवस उलटून गेले,
आपण भेटलो, बोललो नाही,
तू आता आयुष्यात नाहीस,
हे मला जाणवलेच नाही????

मनाच्या एका कोपर्यात
तू सदैव राहशील
तुझ्यावरचे प्रेम सुद्धा
अबाधितच राहील,

माणूस खूप स्वार्थी असतो,
सोबत हवी म्हणत म्हणत
एकटाही जगू शकतो.

आपण दोघेही तेच करतोय
प्रेम असूनही एकटे एकटेच जगतोय
आपले विश्व निर्माण करता करता
वेगवेगळ्या बेटांवर राहतोय,

पावसाने आज वाट  मोकळी केली
उगाचच तुझी आठवण करून दिली
बाहेर जरी ओले चिंब तरी
मी मात्र कोरडीच राहिले!!!!

he vayach ase aste

हे वयच असे असते,
मन कोणावरही जडते,
स्वप्न रंगवत रंगवत
उंच भरारी घेऊ लागते,

सभोताली हे जग
अधिकच सुंदर होते,
तुझे, माझे न  राहता
आपले होऊ लागते,

एकांत आवडू लागतो,
गलबल दूर सारतो,
आठवणीत दंग होऊन,
स्वतःच स्वतःशी हसतो,

तरल सूर ऐकू येतात,
मानला स्पर्शून जातात,
ती इथेच आहे  की  काय
असे भास ही होऊ लागतात

हे प्रेम असंच असते का?
इतकंच सुंदर फुलते का?

Nisarga

एक वाट चालत होते, रानात
धूसर धूसर
मनी होती कसलीशी 
हुरहूर
धुंद, मंद वातावरण
त्या सोबत सूर्याची सुंदर साथ
हिरवी, पिवळी, लाल, गुलाबी
पानेफुले, एक वेगळाच थाट
पाखरांचा किलबिलाट
झाडांशी  हितगुज
संगती असे वाराही
एक वेगळाच नूर
एक वेगळाच सूर
एक अनुभवता आणि पाहता सारे
होते मी निशब्द
निसर्गाची किमया
असते काही औरच
मी एकटीच चालते
स्वतःलाच शोधते
स्वतःलाच सापडते

Duur

काही दिवसांपासून मला हे जाणवतंय,
आपल्यात अंतर निर्माण होताय,
तुझ्या आठवणी येत नाहीत,
पाहिल्यासारखे बोलणे ही होत नाही

तू म्हणाली होतीस, माझ्यात गुंतू नकोस,
वेडी माया लावू नकोस,
मी कदाचित तेच करतोय,
तुझ्याशिवाय एकटाच जगण्याचा प्रयत्न करतोय.

ही नाती अशी का विरतात?
पाण्यासारखी का झिरपत जातात?
व्याख्या का बदलतात?
का दुरावे निर्माण होतात?

हे असेच घडणार असते,
तर भेटीच कशाला होतात?
का मनात प्रेम जागवून
माणसे दूर निघून जातात?

Saad

असे खुपदा होते,
आपल्याला कोणीतरी आवडते,
हे त्या व्यक्तीला 
सांगणेच राहून जाते.

आपण पुढे चालत राहतो,
कुणीतरी बरोबर असते,
कुणीतरी मग मागेच
राहून जाते

उरतात मग फक्त आठवणी
आणि त्या व्यक्तींचे धूसर चेहरे
साद घातली तरी
आपल्यालाच आपली हाक ऐकू येते

कुणीतरी दूर जाण्याआधीच
त्या व्यक्तीला थांबवा
आठवणीवर जगण्याऐवजी
त्या व्यक्तीन बरोबरच आयुष  घालवा!!!

MrugjaL

मन उदास उदास
मनी कसला तो ध्यास?
कातार्वेली?
मन भकास भकास
उरी दाटला हा स्वाश
सांजवेळी
मन होई कासावीस
साद घाले कोणास?
ह्यावेळी?
मनी कसली ही हुरहूर
नुसती घालमेल मेटाकुट
प्रेम तर असते केवळ
एक मृगजळ 
केवळ एक मृगजळ

Life without you

Life without you
has been kind to me
but still
I keep on yearning,
thinking
and waiting.

You are gone forever,
reasons? whatsoever!!!
seemed like everything was over

But I have to carry on,
cos my heart still goes on,
life just moves on…….

Gele kahi diwas

गेले काही दिवस मला असे होतंय,
खूप अस्वस्थ आहे, विचारांचे वादळ घोन्गावतंय
मन थार्यावर नाही, कुणाच्यातरी मागे पळतंय,
हे असे करणे चांगले नाही, मला कळतंय,
तरीही मन पुन्हा पुन्हा तीच चूक करतंय,
हा प्रवास कधी थांबणार?
मनातले वादळ कधी थोपणार?
ह्या प्रश्नांची उत्तरे देणारे
कुणीतरी तिथे माझी वाट पहातंय,
दूर
कुठेतरी माझी वाट पहातंय.

Ashru

आठवणी दाटून आल्या
की मग मन ही बावरते
स्वताला मोकळे करण्यासाठी 
मग अश्रूंची साथ घेते

Aathwan

माझ्या असण्याने किवां नसण्याने
तुला काही फरक पडतो का?
माझ्यासारखा तुही
कधी आठवणीन मध्ये झुरतोस का?
माझ्यासारखा तुही 
कोणाची तरी वाट बघतोस का?

Doan kinare

तू आणि मी
दोन किनारे
सोबत असूनही
कधीच न भेटणारे
जशी आभाळाला क्षितीज्यावर
धरणी कधीतरी भेटते
तसीच कधीतरी
आपली ही भेट होईल काय?
तसीच कधीतरी
आपलीही वाट जुळेल काय?
आपली ही भेट होईल काय?

Tu aani mi

तू  आणि  मी
कोण ?
कुठले?
का आणि कसे भेटलो?
का एकमेकांत गुंतत गेलो?
हे नाते, बंधन 
का नुसते एक मृगजळ?
प्रश्न , प्रश्न आणि नुसते प्रश्न
कोण आणि कसे देणार ह्यांचे उत्तर?
काही गोष्टी त्या विधात्यानेच ठरवलेल्या असतात
आपण त्या इथे पार पाडायच्या असतात
काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेलीच बरी
नियती एकटीच असते खरी
एक ऋणानुबंध म्हणजेच भेट आपुली
आधीच कुणीतरी ठरवलेली

Bhet

भेटायचे आहे एकदा तुला,
तुझ्याशी बोलायला
खूप काही सांगायला 
तुझेही काही ऐकायला

कितीतरी काळ गेला लोटून,
एकमेकांशी संवाद साधून
एकमेकांना मनातले सांगून
काही क्षण असेच गप्पा एकत्र बसून.

दरम्यान,
खूप काही घडून गेलंय,
मनात घर करून बसलंय
ते सगळे मोकळं करायचय
तुझ्या मिठीत रडायचं आहे.
म्हणूनच.....

naate tujhe majhe

नाते तुझे माझे,
मैत्रीचे,
प्रेमाचे,
विश्वासाचे,
काही न बोलता खूप काही सांगणारे,
शब्दांच्या पलीकडे जाणारे,
हसत हसत रडवणारे,
रडता रडता खेळवणारे,
प्रत्यक्ष न भेटून ही रोज रोज भेटणारे,
निस्वार्थ्पणा टिकवणारे,
नाते  तुझे माझे,
एक दुआ  ,
एक आशीर्वाद,
एक ऋणानुबंध!!!

ya ayushyacya pravasaat

या आयुष्याच्या प्रवासात,
अनेक माणसे भेटतात
काही आपल्याला साथ देतात, काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात ,
काही आयुष्यभर साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.
नाती जपता जपता, तुटणार,
कुणीतरी दूर जाणार,
नवीन नाती जुळत राहणार
आयुष्य म्हटल तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार 
कुणी दूर गेले तर
जगणे थांबवता येत नाही
ह्या अथांग सागरात 
एकटेच पोहता येत नाही ! !!

pahayce aahe maala ekda prem karun

पहायचे  आहे मला  एकदा प्रेम करून ,
काय मिळते स्वताला त्याच्यात हरवून
त्या दोन डोळ्यांच्या अथांग सागरात बुडून,
पहायचे आहे मला एकदा प्रेम करून,
प्रेमात पडणे म्हणजे नक्की काय असते?
कदाचित दोन मनांचे एकमेकांशी सूर जुळणे असते
एकमेकांना सांभाळून, एकमेकांना साथ देणे असते
आपला ही कोणी विचार करते आणि वाट पाहते?
ही कल्पनाच किती आनंददायी असते !!!!
म्हणूनच,
पहायचे आहे माला एकदा प्रेम करून,
काय मिळते स्वताला त्याच्यात  हरवून
त्या दोन डोळ्यांच्या अथांग सागरात बुडून,
पहायचे आहे माला एकदा प्रेम करून.

Lonely

You said you do
And I began to dream
I bore the wings
And felt the strings
Those bonded you with me!

You said you did
The future seemed
So nice and enchanting
Full of love and longing
And there you were for me!!

And now you say you can't
Duties and responsibilities strew your path
Aims and achievements are now in your life prime
For me you can't spare any time
And that's dealt a blow to me!!!

Now I am in a haze
Staring into the infinite
Expecting you are standing somewhere
But I don't find you anywhere
And now no one is with me!!!!

To

काल मी त्याला पाहिले बर्याच वर्षानी,
आठवले सारे पुन्हा प्रखार्शाने
ते एकत्र असणे, ते बागडणे, ते फुलणे,
ते रुसणे, ते  रागावणे,
मग एक मेकांना समजवत बसणे,
ते पावसात ओले चिंब होणे, गरम  चहा एकाच कपात पिणे,
तो प्रेमाचा अंकुर मनात रुजणे ,
त्याचे मला हळूच जवळ घेणे, आणि मी लाजून चूर चूर होणे,
हे सारे किती  छान होते, हेच काय ते सत्य,
असेच वाटत होते 
कुणीतरी हाक मारली,
आग कुठे हरवलीस, स्वप्नात रंगलीस?
तो सारा भूतकाळ आणि ते एक स्वप्नाच ठरले
तो सवंगडी नियतीने परका केला
आणि
परक्याच कोणालातरी माझ्या आयुष्यात स्थान दिले!!!!!!!!!

Shodh

मला कशाचे वाईट वाटत आहे ?
का रडावेसे वाटत आहे ?
सगळे आहे माझ्याजवळ 
तरी कसलीतरी उणीव आहे
मी कोणाचा शोध घेत आहे?
स्वताचा की त्याचा?
त्याचा शोध घेत आहे मी?खरंच?
मी तर अशी कधीच नव्हते
स्वतः मधेच रममाण होते
ही ओढ का? हुरहूर कशाची?
तो मला दिसत नाही
तरी मन म्हणतंय तो इथेच आहे
इथेच कुठेतरी आहे
तो भेटल्याशिवाय  मन शांत होणार नाही
तो समोर आल्याशिवाय हे सारे थांबणार नाही

Ratra

रात्र फार झाली आहे
डोळे मिटत नाहीत
तुझी आठवण आली आहे
अश्रू थांबत नाहीत
हृदयाने कट्टी घेतली आहे
विचार संपत नाहीत
अंधार सगळीकडे झालाय
शरीर हलत नाही
रात्र फार सतावते
आठवण अनावर होते
रात्र अशीच जाते
सकाळ जरा शांतता आणते
तुझी आठवण येत नाही 
असा एकही दिवस जात नाही
आठवणी येतच असतात
गेलेले दिवस का परत येत नाहीत?
तुझी आठवण  काढतच माझ्या रात्री जागणार का?
माझ्या मनातले तुला कधी कळणार का?

tujhyasaathi

तुझ्यासाठी स्वप्न पाहते
तुझ्या मनाशी संवाद साधू पाहते
कळेल का कधी तुला माझा हा कयास?
वाटेल का तुला ही कधीतरी करू दोघांनी हा प्रवास?
काळाच्या मनात काय दडले आहे?
आपल्यासाठी त्याने काय काय ठरवले आहे?
माणूस आशेवर जगत असतो
आयुष्याचा प्रवास सुखकर करत असतो
मी ही त्याच आशेवर जगत आहे
तुला कधीतरी नक्कीच कळेल
आपला सूर नक्कीच जुळेल
नक्कीच जुळेल

premache kode

प्रेमाचे हे कोडे, ना कधी कुणा उलगडे
प्रेमाचे हे फुल घाले सर्वांनाच भूल
प्रेमाच्या पाण्याला खळखळ फार
तरी  वाटे  मनाला  उडे  कारंजे  थुई थुई
प्रेम हे कोडे असते खरे
त्यात  भावना, हुरहूर, ओढ  हे सर्व ओघाने आलेच
प्रेम हे फुल ही असते, 
जे  जगाचा ,माणसाचा ,स्वताचा  विसर  पाडते ,
प्रेम  हे  निर्मळ असावे ,निर्व्याज  असावे
आयुष्यभर  टिकणारे  असावे
प्रेम  करण्यासाठी  आयुष्यात  कुणीतरी  असावे
आयुष्यात  कुणीतरी  नक्कीच  असावे



naate manache

असं का होतं?
मन कधीच शांत नसते
नुसतं कुठेतरी धावत असते
सतत कसलातरी विचार करत असते
काहीतरी ठरवत असते
काहीतरी मिळवायचा प्रयत्न करत असते
जसा काय सगळा आपल्याच हातात असते
पण जगणं म्हणजे नक्की काय असते
मनाशी मनाचा नाते बांधून चालत राहणं असते
मनाचे मनाला समजावत पुढे चालणे असते
फक्त माझे किंवा तुझे न करता
आपले म्हणून करत राहणे असता
नुसते खिडकीतून बाहेरचा जग बघणं नसता
ते जग घरात आणून खुश व्हायचा असतं
जो पर्यंत नाती आहेत तो पर्यंत मन असाच धावत राहणार
दुसर्या मनाचा ठाव घेत नवी वळणे घेत राहणार