तुला मी आणि मला तू
कसे काय भेटलो
एकमेकांच्या सोबतीने
वेगवेगळी आयुष्य जगत चाललो
सगळे सांगतो एकमेकांना
एकमेकांना खांदा देतो
हातात हात कधीही न घेता
अखंड साथ मात्र करत असतो
तुझ्याशी चार शब्द बोलून
दिवस छान जातो
एकटेपणा थोडा वेळ का होईना
थोडातरी निशब्द होतो
तू तिथे मी इथे
भेट कधीही होत नाही
एकमेकांच्या आठवणीत असल्याशिवाय
दुसरी जागा काही उरली नाही
कुठेतरी कधीतरी
नाहीतर त्या क्षितिजावर भेटूया
हलकेच समुद्र काठी
लाटा ऐकत एका रम्य संध्याकाळी
कधीतरी दोन क्षण घालवूया
कसे काय भेटलो
एकमेकांच्या सोबतीने
वेगवेगळी आयुष्य जगत चाललो
सगळे सांगतो एकमेकांना
एकमेकांना खांदा देतो
हातात हात कधीही न घेता
अखंड साथ मात्र करत असतो
तुझ्याशी चार शब्द बोलून
दिवस छान जातो
एकटेपणा थोडा वेळ का होईना
थोडातरी निशब्द होतो
तू तिथे मी इथे
भेट कधीही होत नाही
एकमेकांच्या आठवणीत असल्याशिवाय
दुसरी जागा काही उरली नाही
कुठेतरी कधीतरी
नाहीतर त्या क्षितिजावर भेटूया
हलकेच समुद्र काठी
लाटा ऐकत एका रम्य संध्याकाळी
कधीतरी दोन क्षण घालवूया