मित्र
मित्र म्हणजे नक्की कोण असतो?
हाक् न मारताच् जो मदतीला धावुन येतो?
की जो अश्रुनची फुले करतो?
मायेने जो जवळ घेतो?
की जो गम्मत म्हणून टपलित मारुन जातो?
प्रत्यक्ष न भेटता ही तो आठवणीं मधे असतो
आठवण काढताच कधी अचानक समोर ही येतो
आपल्याला काय हव नको ते बघून
आपल्यावर मायेचा जो वर्षाव करतो..
नाती शेवटी मनात असतात
व्याख्या कशा ही नाती ठरवू शकतात?
प्रेम्, जिव्हाळा आणि आपुलकी
हीच तर ह्य मित्राला आपलंस करतात
आयुष्यात एक तरी मित्र असा असावा
ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवता यावा
आपल्यापेक्षा जास्त आपल्याला ओळखणारा असावा
आपलं माणूस म्हणून आपल्यातच वावर्णारा असावा
No comments:
Post a Comment